T20 WC 2022 अव्वल कमनशिबी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण आफ्रिका हा क्रिकेटविश्वातील एक बलाढय़ संघ होय. अनेक मोठय़ा लढती जिंकून त्यांनी ते सिद्धही केले आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेला अद्याप एकदाही विश्वचषक स्पर्धा जिंकता आलेली नाही. जेतेपदासाठी नेहमी दावेदार असलेल्या या संघाच्या बाबतीत प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत काही ना काही घडले अन् त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असा इतिहास आहे. त्यामुळे या संघावर चोकर्सचा शिक्का बसलाय. यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतही अव्वल कमनशिबी असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या हातातील विजय पावसाने हिरावून नेला. सामना रद्द झाल्याने दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे यांना 1-1 गुण विभागून द्यावा लागला.

दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच सुपर-12 लढतीत पावसामुळे एका गुणावर समाधान मानावे लागल्याने त्याचा फटका उपांत्य फेरी गाठताना बसू शकतो. कारण दक्षिण आफ्रिकेचा समावेश असलेल्या दुसऱया गटात हिंदुस्थान, पाकिस्तान, बांगलादेश या संघांचा समावेश आहे. हिंदुस्थान व पाकिस्तान यांनी सुपर-12 फेरीत सर्व लढती जिंकल्या तर मग दक्षिण आफ्रिकेची उपांत्य फेरीची वाट अवघड होऊ शकते.

सुपर 12 गुणतालिका

संघ (गट अ)    सा वि   परा. नेररे       गुण

न्यूझीलंड      1    1    0     +4.450     2

श्रीलंका        1    1    0     +2.467     2

इंग्लंड          1    1    0     +0.620     2

अफगाणिस्थान    1    0     1      -0.620     0

आयलँड        1    0    1     -2.467     0

ऑस्ट्रेलिया    1    0    1     -4.450     0

संघ (गट ब)    सा वि   परा. नेररे       गुण

बांगलादेश    1    1    0     +0.450     2

हिंदुस्थान     1    1    0     +0.050     2

द. आफ्रिका   1    0    0     +0.000     1

झिम्बाब्वे     1    0    0     +0.000     1

पाकिस्तान    1    0    1     -0.050     0

नेदरलँडस     1    0    1     -0.450     0

(टीपः साःसामने, विःविजय, पराः पराभव, नेररेः नेट रनरेट)