
आयसीसी टी-20 विश्वचषकात सेमीफायनल गाठण्याचा पहिला मान इंग्लंडला मिळाला आहे. इंग्लंडने सोमवारी श्रीलंकेचा पराभव करत सलग चौथा विजय मिळवला आणि सेमीफायनलमधील जागा पक्की केली.

सेमीफायनलमध्ये गेलेल्या इंग्लंडच्या संघाला धक्का बसला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज टाइमल मिल्स याला दुखापत झाली आहे.

टाइमल मिल्स याच्या मांडीला दुखापत झाली आहे. पुढील 48 तास इंग्लंडचे आरोग्य पथक त्याच्यावर लक्ष ठेऊन असणार आहे, आणि यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

इंग्लंडकडे सध्या रिसी टॉप्ले, जेम्स विन्स आणि लियान डाउसन हे राखीव खेळाडू असून मिल्स स्पर्धेतून बाहेर फेकला गेला तर यापैकी एकाचा संघात समावेश होती.

मिल्स खेळू शकला नाही तर इंग्लंडच्या संघाला धक्का बसणार आहे. कारण वर्ल्डकपमध्ये इंग्लंडकडून आदिल राशिदसोबत मिल्सने सर्वाधिक 7 बळी घेतले आहेत.
Photo – कश्मीर की कली! नुकतीच आई झालेल्या अभिनेत्रीचे ‘गुलाबी’ फोटो व्हायरल





























































