
आयसीसी टी-20 विश्वषचकाचा शेवट टीम इंडियाने विजयाने केला आहे. सोमवारी झालेल्या लढतीत टीम इंडियाने नामिबियाचा 9 विकेट्सने पराभव केला. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा शेवटचा टी-20 सामना होता. टीम इंडियाने हा सामना जिंकत त्याला विजयाने निरोप दिला. विराटने कर्णधारपद सोडले असले तरी एक खेळाडू म्हणून तो संघाकडून खेळत राहणार आहे.
नामिबियाने टीम इंडियापुढे विजयासाठी 133 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान टीम इंडियाने रोहित शर्माच्या मोबदल्यात पूर्ण केले. रोहित शर्मा याने 54 धावा केल्या. केएल राहुल अखेरपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने 56 धावा केल्या. सूर्यकुमार यादव याने नाबाद 25 धावांचे योगदान दिले.
T20 WC कपिल देव यांचा विराटसेनेवर गंभीर आरोप, BBCI कडे केली ‘ही’ मागणी
तत्पूर्वी रविंद्र जाडेजा आणि आर. अश्विनच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने नामिबियाला 132 धावांवर रोखले. जाडेजा आणि अश्विनने प्रत्येकी तीन बळी घेतले, तर जसप्रीत बुमराह याने 2 बळी घेत त्यांना उत्तम साथ दिली.
कोहली-शास्त्री जोडीचं रिपोर्टकार्ड; वाचा टीम इंडियानं काय मिळवलं, काय गमावलं…




























































