एकाच घरात 8 बायकांसोबत सुखाचा संसार! कलाकाराने उलगडलं गुपित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकाच घरात 8 पत्नींसोबत राहणाऱ्या एका माणसाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. तो कलाकार असून त्याच्या या अशक्य वाटणाऱ्या कृतीविषयी अनेकांना अचंबा वाटत आहे.

या माणसाचं नाव ऑन्ग डॅम सोरोट असं आहे. तो थायलंड इथला रहिवासी आहे. ऑन्ग हा व्यवसायाने टॅटू कलाकार आहे. ऑन्गला एक दोन नव्हे तर चक्क आठ बायका आहेत. गंमत म्हणजे त्या सगळ्या गुण्यागोविंदाने एकमेकींसोबत राहतात. ऑन्गसोबत त्या आनंदाने राहतात. त्याच्या आठही बायका चार वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहतात. तो त्यांच्यासोबत क्रमाक्रमाने वेळ घालवणं पसंत करतो, असं त्याचं म्हणणं आहे.

तो त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने भेटला होता. त्याच्या पहिल्या पत्नीवर त्याचं पहिल्या नजरेत प्रेम बसलं होत. त्या पत्नीला तो आपल्या मित्राच्या लग्नात भेटला होता. दुसरी पत्नी त्याला बाजारात भेटली होती. तर तिसरी पत्नी त्याला रुग्णालयात भेटली होती. तर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या पत्नीला तो सोशल मीडियावर अनुक्रमे इन्स्टाग्राम, फेसबुक आणि टिकटॉकवर भेटला होता. त्यानंतर आईसोबत एका धार्मिक स्थळी जात असताना त्याची भेट त्याच्या सातव्या पत्नीसोबत झाली. मग आठवी बायको त्याला सुट्ट्यांसाठी बाहेरगावी गेलेला असताना भेटली.

त्याच्या सगळ्या बायका या त्याच्या स्वभावाकडे आकर्षित झाल्या आहेत. त्याचा स्वभाव खूप प्रेमळ आणि काळजीवाहू प्रकारचा आहे. त्यामुळे त्या सगळ्या जणी गुण्यागोविंदाने त्याच्यासोबत नांदतात. त्याच्या प्रेमात वेडं झाल्यानेच आपण त्याचं आधी लग्न झालेलं असूनसुद्धा लग्नासाठी तयार झालो, असं त्या सगळ्या जणींनी म्हटलं आहे.