‘निष्ठा कप’चा फुटबॉल जल्लोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने शिवसेना नेते, आमदार तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर निष्ठा कप 2026- पर्व 3’ फुटबॉल स्पर्धेचा थरार रंगला. युवासेना मुंबई समन्वयक तथा मुख्य आयोजक स्वामी जावळे यांच्या पुढाकाराने झालेल्या स्पर्धेला नगरसेवक विजय भणगे आणि उद्योजक बाबूशेठ पवार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी भावेश चव्हाण, विक्रांत जावळे, आदित्य पवार, प्रसाद देवेंद्र, शृंखल हिरवे आणि सिद्धार्थ हवनार यांनी विशेष परिश्रम घेत फुटबॉल जल्लोषाला यशाचा गोललगावला.