
निवडणूक आयोगाकडून सध्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहीमेअंतर्गत (एसआयआर) बीएलओंकडून गृहभेटी सुरु आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हा गृह भेटींचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा, अशी विनंती ऍड. नरेश दहिबावकर यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. ही गृहभेट मोहीम 29 जुलै 2026 पर्यंत पार पडणार आहे, मात्र सध्या मुंबईत अतिवृष्टी सुरू असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे आवाहन केले आहे.





























































