FIFA World Cup 2026 – वर्ल्ड कप राऊंड अप, वायकिंगांची ‘नौका’ जमिनीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॉर्वेच्या चाहत्यांनी ब्राझीलविरुद्धच्या लढतीपूर्वी आणि विजयानंतर प्रसिद्ध ‘वायकिंग रो’ सुरू केला. चाहते जमिनीवर बसले, हात वह्यांसारखे हलवले आणि सारे चाहते जणू अदृश्य नौका चालवू लागले. फुटबॉल स्टेडियमच्या बाहेर समुद्र नव्हता, पण वायकिंगना त्याची गरजही नव्हती. ब्राझील हरल्यानंतर तर ही काल्पनिक नौका थेट इतिहासाच्या किनाऱ्यावर पोहोचली.

रिओमध्ये सांबा  ‘सायलेंट

ब्राझीलमध्ये मोठय़ा स्क्रीनसमोर हजारो चाहते उत्सवासाठी जमले होते. हालांदच्या दुसऱ्या गोलनंतर दृश्य बदललं. काही क्षणांपूर्वी नाचणारे पाय थांबले, चेहरे गोठले, हात डोक्यावर गेले. फुटबॉलमध्ये शांततेलाही आवाज असतो. कालच्या रात्री रिओ आणि साओ पाउलोने तो आवाज ऐकला. हालांदच्या गोलानंतर सर्वत्र ब्राझिलियन शांतता पसरली होती.

एक गोलहजार चेहरे बदलले

मेक्सिको सिटीतील मोठय़ा स्क्रीनसमोर ज्युलियन क्विनोनेसने गोल करताच गर्दीचा चेहरा एका सेपंदात बदलला. आधी ताण, मग किंकाळी, मग उडय़ा आणि मग अनोळखींच्या मिठय़ा. फुटबॉलमध्ये ओळखपत्र लागत नाही. गोल झाला की शेजारचा माणूस कोण, हे विचारायचं नसतं. त्याला पकडून हवेत उचलायचं असतं!

हॉटेलचा पत्ता फुटलागुप्तता संपली!

इंग्लंडने आपल्या संघाच्या हॉटेलचा पत्ता गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मेक्सिकन चाहत्यांनी तो शोधलाच. इंग्लंड संघाची बस पोहोचताच शेकडो चाहते, शिट्टय़ा, ‘मेक्सिको’च्या घोषणा आणि बुइंग सुरू केला. इंग्लंडला वाटलं होतं, पत्ता ‘कॉन्फिडेन्शियल’ आहे, मात्र मेक्सिकन चाहत्यांनी दाखवलं की फुटबॉलच्या देशात गुगल मॅपच्या वेगापेक्षा चाहत्यांचं नेटवर्क वेगवान असतं.

झोपू नका इंग्लंडवाल्यांनो!

रात्री मोठे स्पीकर्स, हॉर्न, मोटरसायकली आणि गोंगाट सुरू होता. मेक्सिकन चाहत्यांची रणनीती स्पष्ट होती. इंग्लिश खेळाडूंना शांत झोप मिळू द्यायची नाही. मैदानावरचा प्रेसिंग ऐकला होता; पण हॉटेलबाहेरचा ‘स्लीप प्रेसिंग’ वेगळाच होता. या घटनेने फुटबॉलच्या रणनीतीच्या पुस्तकात नवा अध्याय लिहिला गेला. प्रतिस्पर्ध्याच्या बचावाआधी त्यांच्या उशीवर हल्ला करा. त्यांना झोपूच देऊ नका.

अँचेलोटींची प्रयोगशाळाच उडालाr

गॅब्रिएल मार्टिनेलीला मध्यफळीत वापरण्याचा कार्लो अँचेलोटींचा डाव धाडसी होता. पण बाद फेरी म्हणजे विज्ञान प्रदर्शन नसतं. प्रयोग यशस्वी झाला तर नोबेल, फसला तर विमानाचं तिकीट. ब्राझीलकडे चेंडू होता, आक्रमण होतं, संधी होत्या, पण शेवटचा घाव नव्हता. नॉर्वेने प्रयोगशाळेत शिरून थेट मुख्य स्विचच बंद केले.