
विरार-वसईतील ज्येष्ठ पत्रकार उमाकांत वाघ यांचे आज अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांचे वय 71 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. उमाकांत वाघ यांनी गेली अनेक वर्षे दैनिक ‘सामना’सह अन्य आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये विरार-वसई वार्ताहर म्हणून काम केले होते. काही काळ त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेचे पालघर जिल्हा शाखेचे अध्यक्ष पदही भूषवले. त्यांनी स्वतःचे साहित्य संगम या नावाने मासिक सुरू केले. त्यातून साहित्य विषयक घडामोडींसह अनेक स्थानिक आणि अपरिचित साहित्यिकांना प्रकाशझोतात आणले. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


























































