नाशिक लोकसभेतील युवासेनेच्या पदांकरिता मुलाखती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक लोकसभेतील पदांकरिता नेमणुका करण्यात येत असून सर्व पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. शनिवार, दि. 11 जुलै रोजी सकाळी 10 वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, शालिमार चौक, नाशिक येथे या मुलाखती होणार आहेत.

नाशिक शहर – पूर्व पश्चिम, मध्य आणि नाशिक ग्रामीण – सिन्नर, देवळाली, इगतपुरी या विधानसभा क्षेत्रांसाठी या मुलाखती होणार असून युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱयांनी युवासेनेचा सक्रीय सदस्य असणे आवश्यक आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहणे आवश्यक असून येताना आपले छायाचित्र सोबत आणावे. इच्छुक कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज सदर मुलाखती ठिकाणी ठेवण्यात येतील, अशी माहिती युवा सेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.