
उरणच्या जेएनपीएच्या अंतर्गत असलेल्या खासगी एनएसएफटी बंदरात आज मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पाऊस आणि वाऱ्याच्या तडाख्याने जहाजावर चढवण्यात आलेले रिकामे तीन कंटेनर एका ट्रेलरवर कोसळले. या दुर्घटनेत ट्रेलरवर हेल्पर म्हणून काम करणारा अजितपुमार प्रसाद (19) हा कामगार जागीच ठार झाला. तर नईम नासीर (30) हा गंभीर जखमी झाला. ही घटना जहाजावरून टँकरमध्ये स्लज ऑइल भरताना पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान घडली.






























































