
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (UP Election) रंगत शिगेला पोहोचली असून प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला पायउतार करण्यासाठी प्रियांका गांधी-वाड्रा यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या काँग्रेसने देखील आपली पाचवी यादी जाहीर केली. पहिल्या तीन याद्यांप्रमाणे या यादीतही महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यातील एक नाव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
काँग्रेसने रविवारी आपली पाचवी यादी जाहीर केली. यात काँग्रेसने 24 महिलांना उमेदवारी दिली आहे. यातील एक नाव चकमकीमध्ये मारला गेलेल्या विकास दुबे याचा भाचा अमर दुबे याच्या सासूचे आहे. काँग्रेसने कानपूर जिल्ह्यातील कल्याणपूर मतदारसंघातून अमर दुबे याच्या पत्नीच्या आईला तिकीट दिले आहे.
कानपूरच्या बिक्रू गावात 2020 मध्ये विकास दुबेला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी गुंडांनी हल्ला केला होता. यात अनेक पोलिसांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी 8 जुलै 2020 ला अमर दुबे याचे एन्काउंटर केले होते, तर 10 जुलैला मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशमध्ये आणत असताना विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या होत्या. पोलिसांच्या हत्याकांडातील आरोपी अमर दुबे याच्या सासू गायंत्री देवी यांना आता काँग्रेसने निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.
UP Election 2022 ‘पाच वर्ष कुठे होतात?’ म्हणत गावकऱ्यांची भाजप उमेदवारावर दगडफेक
गायत्री देवी यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांची भेट घेतली होती. ब्रिक्रू हल्ल्यावेळी अमर दुबे याची पत्नी नवविवाहिता होती. हातावरची मेंदी उतरत नाही तोच अमर पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. त्यानंतर त्याची पत्नी खुशी हिलाही अटक करण्यात आली. गायत्री यांनी खुशीची सुटका करण्याची मागणी केली आहे. विकास आणि अमर दुबे यांच्या गुन्हेगारी कारनाम्यांशी तिचा संबंध नसल्याचे गायत्री यांनी म्हटले आहे.
UP Elections 2022 : अखिलेश यादव यांच्याविरोधात भाजपची नवी खेळी, यादवांच्या सूनेऐवजी यांना उमेदवारी?
काँग्रेसवर टिका
दरम्यान, ब्रिक्रू येथे हल्ल्यात ठार झालेल्या शहीद पोलीस अधिकाऱ्याच्या भावाने काँग्रेसच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. शहीद अनूप कुमार सिंग यांचे बंधू अनुज यांनी काँग्रेसवर टिका करताना म्हटले की, आम्ही भावाच्या अकाली मृत्यूमुळे अद्याप सावरलेलो नाही. अशातच राजकीय पक्ष गँगस्टर अमर दुबेच्या कुटुंबियांना संरक्षण देत असेल तर ते निषेधार्ह आहे.
UP Election मी आधी मुसलमान, मग हिंदुस्थानी; सपा नेत्याच्या व्हायरल व्हिडीओनं राजकारण तापलं




























































