झटपट पैशासाठी यूपीएससीचा विद्यार्थी बनला ठग

खासगी कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे भासवून गारमेंट व्यावसायिकाची फसवणूक करणाऱयाला वाकोला पोलिसांनी अटक केली. उमेश रंजक असे त्याचे नाव आहे. तो यूपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास करत होता. झटपट पैशासाठी तो ठगाच्या माध्यमातून फसवणूक करत होता.

उमेशने सांताक्रूझच्या व्यावसायिकाला लिंक पाठवत त्यांच्या बँक खात्यातून 4 लाख 43 हजार रुपये काढले होते. तक्रारीनंतर वरिष्ठ निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या पथकातील उपनिरीक्षक यशपाल बडगुजर यांच्या पथकाने रांची येथून उमेशला पकडले.