पाकिस्तानात हिंसाचार उसळला, लाहोरजवळ 800 शीख भाविक अडकले

lahor-pakistan

हिंदुस्थानचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये मंगळवारी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या दरम्यान अनेक शहरांमध्ये पोलीस आणि इस्लामचे कडवे समर्थन करणारा पक्ष तहरीक-ए-लब्बॅक पाकिस्तान (टीएलपी) च्या कार्यकर्त्यांमध्ये झाली. टीएलपी गेल्या काही महिन्यांपासून फ्रांसच्या राजदूताला पाकिस्तानातून बाहेर काढण्याची मागणी करत निदर्शनं करत आहे. मंगळीवार टीएलपीच्या अध्यक्ष साद रिजवी यांना पोलिसांनी अटक केली, त्यानंतर पाकिस्तानात हिंसाचार सुरू झाला.

पीटीआयच्या माहितीनुसार, हिंसाचारात एका पोलिसाची हत्या करण्यात आली. तिथे टीएलपीने देखील 12 कार्यकर्ते मारले गेल्याचा दावा केला आहे. या तणावानंतर लाहोरमध्ये सुरक्षादलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. टीएलपीच्या कार्यकर्त्यांनी रस्ते रोखून धरले आहेत. यामुळे 800 हून अधिक हिंदुस्थानी शीख अडकून पडले आहेत.

गुरुद्वारा ‘पंजा साहिब’च्या दर्शनासाठी गेले होते शीख बांधव

सोमवारी (12 एप्रिल) रोजी बैसाखी साजरी करण्यासाठी 815 शिखांचा एक गट वाघा-अटारी सीमेवरून पाकिस्तानात दाखल झाला. तिथे गुरुद्वारा पंजा साहिबचे दर्शन घेण्यासाठी ते गेले आहेत. मात्र अद्याप ते गुरुद्वारात पोहोचलेले नाहीत. वृत्तसंस्थेने पाकिस्तानी सरकारच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की मंगळवारी 25 बसमधून शीख बांधवांचा गट गुरुद्वारा पंजा साहिब येथे जाण्यासाठी निघाला, मात्र याच दरम्यान हिंसाचार वाढल्याने रस्ते बंद करण्यात आले आहेत. यामुळे शीख भाविक लाहोरमध्येच अडकले आहेत. पाकिस्तानी अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की बुधवारी शीख भाविकांना गुरुद्वारेत सुरक्षित पोहोचवण्याचे संपूर्ण प्रयत्न करण्यात येतील.

आपली प्रतिक्रिया द्या