वेताळ टेकडीवर नशेत आढळल्या तरुणी, नशामुक्त शहर अभियानाचे धिंडवडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेते रमेश परदेशींनी केला व्हिडीओ लाइव्ह

नशामुक्त शहर करण्यासाठी पुणे पोलिसांनी हाती घेतलेल्या अभियानाचा बुरखा एका धक्कादायक व्हिडीओने फाडला. कोथरूडमधील वेताळ टेकडीवर मद्यधुंद अन् नशेच्या आहारी गेलेल्या दोन तरुणी आढळून आल्या. मराठी चित्रपट अभिनेते ‘मुळशी पॅटर्न फेम रमेश परदेशी (पिटय़ा भाई ) यांनी संबंधित क्हिडीओ लाइक्ह करून नशेच्या धुंदीत असलेल्या मुलींची अकस्था उघडकीस आणली. पुण्यातील वाढत्या नशेखोरीचे भीषण वास्तव समोर आणून पालकांना सावधानतेचा इशाराही दिला.

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात देशभरातून विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात. मात्र अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी संगत, पालकांचे दुर्लक्ष, हौस-मौज करण्यासाठी नशेच्या आहारी जात असल्याचे अनेक घटनांवरून उघडकीस आले आहे. विशेषतŠ पब, रात्रीच्या पाटर्य़ांसह टेकडय़ांवर तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याचे व्हिडीओतून दिसून आले आहे. त्यात आजच्या घटनेने भर घातली आहे. दरम्यान, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल 3600 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन तस्करीचा पर्दाफाश केल्यानंतरही नशेत टल्ली झालेल्या तरुणींच्या या कृत्यामुळे पुणेकरांकडून जोरदार टीका होत आहे. शहरभरात अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला असतानाही अजूनही ड्रग्जमाफियांकडून किद्यार्थ्यांना अमली पदार्थांचा पुरकठा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोथरूडमधील वेताळ टेकडीवर फिरण्यासाठी गेलेले अभिनेते रमेश परदेशी यांनी नशेत बेधुंद असलेल्या तरुणींचा क्हिडीओ लाइव्ह करून पालकांच्या डोळ्यात अंजन घातले.

कोथरूड पोलिसांनो, जागे व्हा…

शहरातील कायदा-सुव्यवस्थेचे अनेक प्रसंग कोथरूड परिसरात घडले आहेत. विशेषत: कुख्यात शरद मोहोळचा खून, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करताना सराईतांच्या राडय़ामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचे धिंडवडे निघाले आहेत. त्यासोबतच घरफोडय़ा, मोबाईल हिसकावण्याच्या घटना, वाहनांची तोडफोड, टोळ्यांमुळे नागरिक दहशतीखाली आहेत. असे असतानाच आता अमली पदार्थ तस्कर कोथरूड पोलिसांच्या हद्दीत आले आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे कोथरूड पोलिसांनो, जागे व्हा, असे आवाहन नागरिकांनी केले आहे.

बेधुंद नशेत मुली टल्ली

कोथरूड परिसरातील केताळ टेकडीकर दोन मुली दारू आणि ड्रग्सच्या नशेत धुंद अवस्थेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱया मुलींमध्ये एका मुलीची शुद्ध हरपल्याचे दिसते, तर दुसरी मुलगी ही पूर्णपणे नशेत असल्याचे दिसून येते. अभिनेते परदेशी यांच्यासह टेकडीकर फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी मुलींच्या चेहऱयाकर पाणी मारून त्यांन0ा शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.