दीरासोबत अनैतिक संबंध ठेवण्याकरिता एका महिलेने नवऱ्याची हत्या केली. हत्येनंतर नवऱ्याचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे लोकांना सांगितले. पाच महिन्यानंतर या घटनेचा खुलासा झाला.
उदयपूर शहरातील प्रतापनगर येथे 5 महिन्यांपूर्वी पोलिसांना एका अज्ञात व्यक्तिचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांच्या विशेष पथकाचे कॉन्स्टेबल प्रल्हाद पाटीदार यांना सूचना मिळाली होती की, दोन व्यक्ती एका व्यक्तिचे मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्याकरिता तहसीलदार कार्यालयात सतत येत आहेत. तेव्हा पोलिसांनी या दोन व्यक्तींवर पाळत ठेवली.
त्यावेळी या व्यक्ति खोटे मृत्यू प्रमाणपत्र बनवून घेण्याकरिता आल्या होत्या असे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही अटक करून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता या व्यक्तिंनी त्यांच्या इतर तीन साथीदारांची नवे सांगितली शिवाय त्रिपूरा येथे राहणाऱ्या प्रदीप दास या व्यक्तिने सुपारी दिली असल्याचेही सांगितले.
याबाबत पोलीस अधिकारी राजीव पाचर यांनी दिलेली माहिती अशी की, एका महिलेचे तिचा मोठा दीर तपनदास याच्यासोबत अनैतिक संबंध होते. याकरिता या महिला आणि तिच्या दिराने त्याचा लहान भाऊ उत्तमदास याला मारण्याची सुपारी दिली आणि त्याची हत्या केली.
नवऱ्याची हत्या करवून घेतल्यानंतर त्याच्या कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती गावातील लोकांना त्याच्या पत्नीने दिली. या प्रकरणी पोलिसांनी दीर, मृत व्यक्तिची पत्नी आणि उदयपूर येथील पाच आरोपींना अटक केली आहे.




























































