माझा भाऊच माझा नवरा आहे, कुटुंबातील गुंतागुुंतीच्या नात्यांविषयी महिलेचे धक्कादायक खुलासे

अलीकडेच एका महिलीने सोशल मीडियावर तिने चित्रीत केलेल्या व्हिडीओ सीरीजमध्ये तिच्या कुटुंबाची ओळख करून दिली. मात्र तिचे कुटुंब विचित्र नात्यात गुंतलेले असल्याच्या टीका नेटीझन्स द्वारे करण्यात आल्या. या टीकांना पूर्ण विराम देण्यासाठी महिलेने आणखी एक व्हिडीओ टाकला आहे. या व्हिडीओमध्ये तिने भावासोबत केलेल्या लग्नाबाबत उलगडा केला आहे.

अलाबामा येथे राहणारी लिंडसे आणि कॅड ब्राऊन यांचे 2013 मध्ये लग्न झाले होते. आता त्यांना दोन मुले देखील आहेत. लिंडसेने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार ती आणि तिचा नवरा कॅड हे सावत्र भाऊ बहिण आहेत. लिंडसेच्या मते कॅडसोबत प्रेमात पडण्यापूर्वी ते दोघे भाऊ बहिण नव्हते. त्यामुळे आमचे नाते गैर नसून आमच्यातील भाऊ बहिण हे नाते फक्त दुर्घटना असल्याचे लिंडसेने सांगितले आहे.

लिंडसे आणि कॅड पहिल्यांदा जेव्हा भेटले होते तेव्हा ते शाळेत होते. त्यानंतर ते एकमेकांना डेट करत होते. 2007 मध्ये कॅड लपून छपून लिंडसेला भेटायला होता. तेव्हा लिंडसेच्या आईने त्यांना पकडले होते. त्यानंतर लिंडसेच्या आईने दोघांनाही ताकीद देऊन सोडले होते. मात्र लिंडसेने ऐके दिवशी कॅडला भेटण्यासाठी निघाली असताना लिंडसेच्या आईने तिचा पाठलाग केला. त्यादिवशी पहिल्यांदा लिंडसेची आई कॅडच्या वडिलांना पहिल्यांदा भेटली.

त्यानंतर कॅड वर्षाभराच्या मिलिट्री ट्रेनिंगसाठी गेला. त्यामुळे लिंडसे आणि कॅडमधील अंतर वाढले. मात्र या दरम्यान कॅडचे वडिल व लिंडसेची आई यांच्यातील जवळीक वाढली. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे लिंडसे आणि कॅडला माहित नव्हते. कॅड परत आल्यानंतर लिंडसे आणि कॅडने गपचूप लग्न केले. या लग्नाची माहिती दोघांनीही आपआपल्या घरी दिली. त्यानंतर एका वर्षाने लिंडसीची आई व कॅडच्या वडिलांनी देखील लग्न केले. दोघांच्या आई वडिलांनी जोडलेल्या नात्यामुळे कॅड आणि लिंडसे सावत्र भाऊ बहिण देखील झाले.