जागतिक व्यापार संघटनेविरोधात शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर मोर्चे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी दिल्लीजवळ ठिय्या देणाऱया शेतकऱयांसह आज अनेक राज्यांतील शेतकऱयांनी जागतिक व्यापार संघटनेच्या कराराविरोधात ट्रक्टर रॅली काढत ठिकठिकाणी जोरदार आंदोलन केले. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात ट्रॅक्टर रस्त्यांवर आणत शेतकऱयांनी डब्ल्यूटीओच्या प्रतिकृतींचेही दहन केले.

कृषी क्षेत्राला मारक अशा जागतिक व्यापार संघटनेच्या या करारातून कृषी क्षेत्राला वगळा अशी शेतकऱयांची मागणी आहे. हे आंदोलन सुरू असतानाच संयुक्त अरब अमिरातीमध्ये व्यापार संघटनेची 13 वी परिषद सुरू झाली आहे. या व्यापार करारामुळे कृषी क्षेत्राची सबसिडी समाप्त होईल आणि हिंदुस्थानी कृषी क्षेत्रासाठी ते आत्महत्येसारखेच असेल, असा शेतकरी नेत्यांचा दावा आहे.

ट्रक्टर आणून रोखली वाहतूक
संयुक्त किसान मोर्चा महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलकांनी पंजाब आणि हरयाणामधील अनेक ठिकाणी महामार्गावर ट्रक्टर उभे केले होते. उत्तराखंड, उत्तर प्रदेशातही रॅलींमुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली.