कोरोनाचे कठोर निर्बंध; जिनपिंग यांच्याविरोधात उठाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून रविवारी एकाच दिवशी 40 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शी जिनपिंग सरकारने झीरो कोविड धोरण अवलंबत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे हजारो नागरिकांनी शांघाय शहरासह ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या विरोधात उठाव करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शांघाय शहरात रविवारी सकाळपासूनच नागरिक रस्त्यावर उतरत सरकारविरोधात निदर्शने करत आहेत.