
नाशिक येथील भोंदू बाबा खरात प्रकरणानंतर अमरावतीतील परतवाडा येथे स्त्री लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस येत नाही तेच यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातून गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३४ आदिवासी मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणामागे आंतरराज्य मानर्वा तस्करी आणि देहव्यापाराची मोठी टोळी सक्रिय असल्याचा आरोप होत असून, एका कथित ऑडिओ क्लिपने या संशयाला बळकटी दिली आहे. पोलिसांनी या बाबत तपस सुरू केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावमधील अल्पवयीन आदिवासी मुलींना फूस लावून परराज्यात विकले जात असून, त्यामागे मानवी तस्करीचे मोठे जाळे असल्याचा आरोप केल्या जात आहे . या प्रकरणात ‘मजहर कुरेशी’ नामक व्यक्ती मुख्य सूत्रधार असल्याचा दावाही करण्यात आला असून, यामागे ‘लव्ह जिहाद’ किंवा धर्मांतराचा हेतू असू शकतो का, याचीही तपासणी करण्याची मागणी केली जात आहे.
पोलिसांनी या प्रकरणातील एका संशयित आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, मात्र प्राथमिक चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले. त्यानंतर तो संशयित आरोपी तेलंगणा राज्याच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला पुन्हा पकडले. आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे .
ऑडिओ क्लिपमुळे गुढ वाढले…
या प्रकरणात एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये एक तरुणी आणि तिचा प्रियकर यांच्यातील संभाषण असून, मानवी तस्करीची कार्यपद्धती आणि मुलींना कशा प्रकारे जाळ्यात ओढले जाते, याचे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. या क्लिपमुळे राळेगाव परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राळेगाव येथे आज कडकडीत बंद
दरम्यान राळेगाव येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला असून प्रशासनाने आरोपीचे घर बुडाडोझर च्या मदतीने जमीनदोस्त केले आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणातील ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख असलेल्या मजहर शरीफ कुरेशी नामक व्यक्तीवर बीएनएसएस कलम १७० प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करून त्याची चौकशी सुरू केली आहे.
हे प्रकरण उघडकीस आल्यावर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडालीअसू जनमानस संतप्त झाले. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी यावेळी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.

























































