युवासेनेतर्फे ऑनलाइन वेबिनार

756

स्पर्धा परीक्षेच्या युगात विद्यार्थी सतत यशासाठी धडपडत असतात, काही हे यश मिळवितात तर काही अपयशी होतात जे अपयशी होतात ते कुठेतरी कमी पडतात. राज्यात स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विविध ठिकाणी मार्गदर्शन केंद्र उभारले आहे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र मध्ये मार्गदर्शन केंद्रांची संख्या जास्त आहे परंतु विदर्भात ही संख्या बोटावर मोजण्याइतकीचं आहे.

यावर युवासेनेचे जिल्हा समन्वयक निलेश बेलखेडे यांनी नवी युक्ती काढत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी youtube च्या माध्यमातून पहिल्यांदाच ऑनलाइन वेबिनारच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोटिवेशनल स्पीकर महेश मानकर हे मार्गदर्शन करणार आहे. मानकर यांनी दशलक्षहुन अधिक लोकांना उत्तम प्रशिक्षण दिले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनात युवासेनेचे जिल्हा समनव्यक निलेश बेलखेडे या ऑनलाइन वेबिनारची जबाबदारी सांभाळत आहे. या वेबिनारच प्रक्षेपण राज्यातील नव्हे तर देशातील स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बघायला मिळणार आहे.

थेट प्रक्षेपण रविवारी 15 डिसेंम्बरला सकाळी 11 वाजता होणार आहे या ऑनलाइन वेबिनारच्या अधिक माहितीसाठी युवासेनेचे जिल्हा समनव्यक निलेश बेलखेडे 9503448802 यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांनी घ्यावी असे आवाहन युवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या