
कोरोना व्हायरसचं वाढतं संकट लक्षात घेत CBSE च्या परीक्षासंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. CBSE 12वी च्या परीक्षा सध्या स्थगित करण्यात आल्या आहेत. तर 10वींच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण मंत्री आणि मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली, ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
12वीसाठी हा आहे निर्णय..
आदेशानुसार, 4 मे ते 14 जून पर्यंत होणाऱ्या 12वी च्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. 1 जून रोजी एक आणखी बैठक घेण्यात येईल. त्यावेळची स्थिती बघून पुढला निर्णय घेण्यात येईल. परीक्षा घेण्यात येणार असतील तर 15 दिवस आधीच विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येईल.
10वी संदर्भात घेतला हा निर्णय
CBSE 10वीचे पेपर्स जे 4 मे ते 14 जून पर्यंत होणार होते, ते पूर्ण रद्द करण्यात आले आहेत. बोर्डाकडून विद्यार्थ्यांच्या परफॉर्मंसच्या आधारावर गुण दिले जातील. कुणी विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर खूश नसतील तर ते नंतर पुन्हा परीक्षा देऊ शकतील.
या निर्णयावर दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी सरकारकडे दोन्ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी देखील परीक्षा रद्द करा अशी मागणी केली होती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली आणि त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.




























































