
बऱ्याच काळापासून ज्या चित्रपटाची प्रतीक्षा होती त्या पृथ्वीराज या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अवघ्या सहा मिनिटात 10 हजार हून लाईक्सचा पाऊस या टीझरवर पडला आहे.
अभिनेता अक्षय कुमार या चित्रपटात पृथ्वीराज चौहान यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर विश्वसुंदरीचा मुकुट पटकावणारी मानुषी छिल्लर ही या चित्रपटात पृथ्वीराज यांची पत्नी संयोगिताच्या रुपात झळकणार आहे. त्याखेरीज अभिनेता संजय दत्त हा मोहम्मद घोरीच्या भूमिकेत दिसेल.
या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांचं असून यशराज फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पुढील वर्षी 21 जानेवारी 2022मध्ये पृथ्वीराज प्रदर्शित होणार आहे.
पाहा ट्रेलर –




























































