सत्ताधाऱ्यांच्या देशविरोधी प्रयत्नांना विरोधीपक्ष हाणून पाडणार; राहुल गांधी यांचे लोकसभेत तडाखेबंद भाषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi-warns-govt-opposition-will-defeat-attempts-to-attack-national-unity

मोदी सरकारकडून लोकसभेत मांडण्यात आलेल्या नारी शक्ती वंदन विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर जोरदार चर्चा सुरू आहे. महिला आरक्षणाच्या विधेयकामागून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणू पाहण्याचा आरोप करत विरोधकांनी मोदी सरकारला चांगलं घेरलं आहे. एकापाठोपाठ एक विरोधीपक्षाचे खासदार मोदी सरकारवरच्या हेतूंवरून त्यांना लक्ष्य करून देशातील परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. शुक्रवारी राहुल गांधी यांनी देखील संसदेत तडाखेबंद भाषण केले. यावेळी सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तरी संयम बाळगत राहुल गांधी यांनी एक एकमुद्द्याला हात घातला आणि सरकावर टिचून मारा केला. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाद्वारे संविधानात सुधारणा करून दक्षिणेकडील राज्यांना, ईशान्येकडील राज्यांना, छोट्या राज्यांचे प्रतिनिधित्व काढून घेऊ पाहणे हे देशविरोधी कृत्यापेक्षा कमी नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की देशाच्या ऐक्यावर, संघराज्यपद्धतीवर हल्ला करण्याच्या तुमच्या प्रयत्नांना विरोधीपक्ष हाणून पाडणार आहे’, अशा शब्दात सरकारला लक्ष्य करत राहुल गांधी यांनी तडाखेबंद भाषण केलं.

‘केंद्र सरकार घाबरलं आहे, सत्ता जाण्याची भिती आहे. म्हणून तुम्ही काय करत आहात, तर या विधेयकाद्वारे संविधानात सुधारणा करून दक्षिणेकडील राज्यांना, ईशान्येकडील राज्यांना, छोट्या राज्यांना तुम्ही सांगू इच्छितात की आम्ही तुमचे प्रतिनिधित्व काढून घेऊ इच्छितो. हे देशविरोधी कृत्यापेक्षा कमी नाही. हे तुम्ही करत आहात. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की देशाच्या ऐक्यावर हल्ला करण्याच्या आणि दलित आणि ओबीसींना समाजातील त्यांच्या स्थानापासून वंचित करण्याच्या तुमच्या (मोदी सरकारच्या) प्रयत्नांना संपूर्ण विरोधीपक्ष हाणून पाडणार आहे’, असं राहुल गांधी म्हणाले.

‘मला प्रश्न विचारायचा आहे की कॉर्पोरेट इंडियात दलित, ओबीसी, आदिवासी आहेत कुठे? प्रशासनातील प्रमुखांची ही चूक आहे. ते कुठे आहेत? न्यायव्यवस्था, खासगी क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, शिक्षण कुठे आहे? पूर्वी पब्लिक सेक्टर असा भाग होता, त्यात दलित, ओबीसी, आदिवासींना स्थान होतं. तुम्ही सगळ्यांना बाहेर काढलं, सगळं संपवलं, तुमच्या मित्रांच्या हाती सगळं दिलं’, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.

‘तुम्ही ओबीसी हिंदू म्हणतात, दलित हिंदू पण तुम्ही त्यांना सशक्त करत नाही, त्यांना यंत्रणांमध्ये स्थान देत नाही. हे तुम्ही कुणाही दलित, ओबीसींना विचारा ते स्पष्ट सांगतील. तुम्ही त्यांना फक्त हिंदू म्हणतात पण कोणतंही स्थान देत नाही, असं राहुल गांधी म्हणाले. यानंतर सत्ताधारी खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली, तेव्हा राहुल गांधी त्यांना म्हणाले की, ‘तुम्हाला सत्य सहन होत नाही’.

‘मी देशातील माझे मित्र, बंधू , भगिनी सर्वांना, दक्षिणेकडील राज्यांना, पूर्वेकडील राज्यांना, छोट्या राज्यांना सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की त्यांनी कोणीही चिंता करू नये. आम्ही सत्ताधाऱ्यांना हे करू देणार नाही. त्यांना देशाच्या ऐक्याला धक्का लावू देणार नाही. तुम्ही सगळे हिंदुस्थानच्या संघराज्यात समान सहभागी आहात’, असं राहुल गांधी म्हणाले. ‘ते (मोदी सरकार) तुम्हाला हिंदुस्थानच्या संघराज्यातील तुमच्या प्रतिनिधित्वाला धक्का लावण्याची ते हिंमत देखील करू शकणार नाही’, अशा शब्दात विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी देशाला आश्वस्त केलं.

‘अशाच प्रश्नाला इंदिरा गांधीजी आणि वाजपेयीजी यांना देखील सामोरे जावे लागले होते. त्यांना यामधील भयंकर वास्तव लक्षात आलं आणि त्यांनी तशी पाऊले उचलली नाहीत जे पंतप्रधान मोदी यांनी केले आहे’, असं राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान मोदी आणि मला ‘पत्नीचा प्रश्न’ नाही: राहुल गांधी

लोकसभेत शुक्रवारी एका चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वतःचा उल्लेख करत मिश्किल टिप्पणी केली. महिला आरक्षण कायद्यातील सुधारणा आणि मतदारसंघ पुनर्रचना आयोग स्थापन करण्याच्या विधेयकांवरील चर्चेत सहभागी होताना राहुल गांधी म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील महिलांकडून खूप काही शिकले आहे.

‘या सभागृहात उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांवरच आपल्या आयुष्यातील महिलांचा – मग त्या माता, बहिणी असोत किंवा पत्नी – प्रभाव राहिला आहे आणि आपण त्यांच्याकडून बरेच काही शिकलो आहोत,’ असे गांधी म्हणाले. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केलेल्या एका हलक्या-फुलक्या टिप्पणीचा संदर्भ देत राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘अर्थात, पंतप्रधान आणि मला ‘पत्नीचा प्रश्न’ (wife issue) नाही, त्यामुळे आम्हाला तिथून मिळणारे ‘इनपुट’ मिळत नाही, परंतु आमच्याकडे आमच्या माता आणि बहिणी आहेत’.

यावेळी राहुल गांधी यांनी त्यांची बहीण आणि काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांच्या गुरुवारी लोकसभेत झालेल्या भाषणाचेही कौतुक केले. सभागृहात ते म्हणाले, ‘काल मी माझ्या बहिणीला ते साध्य करताना पाहिले जे मी माझ्या २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत करू शकलो नाही – म्हणजे अमित शाहजींच्या चेहऱ्यावर हसू आणणे’.