
नाशिकमधील टीसीएस कंपनी, मुंबईतील एसबीआय बँकेतील ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरण ताजे असतानाच हिंजवडीतील ‘विप्रो टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कंपनीतील हिंदू कर्मचारी महिलेवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यात आला. महिलेने धर्मांतरास नकार दिल्याने तिला कंपनीने कामावरून काढले. संबंधित महिलेने याबाबत हिंजवडी पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे.
दरम्यान, या पीडित महिलेने आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ‘आप बिती’ कथन केली. पीडित हिंदू महिला म्हणाली की, ‘कंपनीत कार्यरत असताना माझ्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आणि एका मुस्लिम व्यक्तीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रचंड मानसिक दबाव निर्माण करण्यात आला. या प्रकाराला मी ठामपणे नकार देत कंपनी प्रशासनाकडे तक्रार केली; मात्र प्रशासनाने आरोपीवर कारवाई करण्याऐवजी मलाच नोकरीवरून काढून टाकले’.
महागाईविरोधात डोंबिवलीत बुधवारी संतापाचा भडका उडाला. शिवसेनेच्या पदाधिकारी, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांसह शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत जोरदार आंदोलन केले. डोंबिवली पूर्वेतील इंद्रचौकात शिवसैनिकांनी ‘इंधन दरवाढ थांबवा, जनतेला दिलासा द्या’, ‘सगळं झाले महाग मग सांगा जगायचं कसं?’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
पेट्रोल, डिझेल दरवाढ, गॅसटंचाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कांद्याचे पडलेले दर, नीटचे फुटलेले पेपर यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बुधवारी नवी मुंबईत जोरदार आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष मंगेश आमले आदी सहभागी झाले होते.

























































