अभिषेक बॅनर्जी यांना ईडीचे समन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष वाचवण्यासाठी धडपडणारे तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांना आज मोठा धक्का बसला. बंगालमधील शिक्षकभरती घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीने बॅनर्जी यांना समन्स बजावले आहे. १५ जून रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

ईडी २०२२ पासून बंगालमधील प्राथमिक शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी ईडी करत आहे. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीने अनेक छापे टाकून आतापर्यंत १५४ कोटींची मालमत्ता सील केली आहे.