घटनातज्ञ, पद्मभूषण डॉ. सुभाष कश्यप यांचे निधन; 97 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पद्मभूषण आणि घटनातज्ञ डॉ. सुभाष सी. कश्यप यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने सुभाष कश्यप यांचे निधन झाले. डॉ. सुभाष सी. कश्यप देशातील एक प्रख्यात घटनातज्ञ, राजकीय अभ्यासक आणि संसदीय कामकाज तज्ञ होते.

सुभाष कश्यप यांचा जन्म १० मे १९२९ रोजी झाला. त्यांनी संसदेत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांनी १९८४ ते १९९० या काळात ७व्या, ८व्या आणि ९व्या लोकसभेचे महासचिव म्हणून काम पाहिले. डॉ. सुभाष कश्यप यांनी १९५३ मध्ये संसद सचिवालयात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि जवळपास ३७ वर्षे ते संसदेशी संबंधित राहिले. ते भारतीय संविधान, संसदीय प्रक्रिया आणि घटनात्मक कायद्याचे एक अग्रगण्य तज्ञ मानले जात होते. त्यांनी जिनिव्हा येथील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर पार्लमेंटरी डॉक्युमेंटेशन’ (IPU) चे प्रमुखपदही भूषवले होते.