ठाणे महापालिका मुख्यालयातील शहर विकास विभागात किरकोळ आग; कोणतीही जीवितहानी नाही, कागदपत्रे आणि काही संगणक जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
khoka-bhai-satish-bhosale-house-set-on-fire-by-unknown-persons-family-members-beaten-up

ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील शहर विकास विभागामध्ये सोमवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास किरकोळ आग लागल्याची घटना घडली. मात्र, प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षक, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तत्परतेमुळे आग त्वरित आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, विभागात बसविण्यात आलेल्या स्मोक अलार्म प्रणालीचा आवाज ऐकताच सुरक्षा रक्षकांनी तत्काळ शहर विकास विभागाकडे धाव घेतली. तेथे धूर दिसून आल्यानंतर अग्निशामक यंत्रांच्या साहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. याचवेळी विभागाचा वीजपुरवठा बंद करून अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन पथकाला माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आले.

या आगीत संगणकाचा यूपीएस, काही संगणक तसेच काही कागदपत्रांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तथापि, महापालिकेची ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित असल्याने बहुतांश कागदपत्रे पुन्हा उपलब्ध होऊ शकणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, कार्यालयातील अन्य महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित असून त्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

आगीचे कारण आणि नेमके किती नुकसान झाले याबाबत तपास सुरू असून संबंधित माहिती संकलित करण्यात येत आहे. दरम्यान, आग नियंत्रणात आल्यानंतर परिसराची स्वच्छता करून शहर विकास विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आले