
तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील सर्वात ज्येष्ठ खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी खासदारकीसह पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. गेल्या एका दशकाहून अधिक काळ ते राज्यसभेत पक्षाचे प्रतिनिधित्व करत होते.
गेल्या आठवड्यात बंगाल विधानसभेत झालेल्या फुटीप्रमाणेच आता तृणमूलच्या संसदीय पक्षातही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सुखेंदू शेखर रॉय यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच पक्षाचे किमान पाच खासदार त्यांच्यासोबत एका छायाचित्रात एकत्र दिसले त्यामुळे ते देखील राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे. सुखेंदू शेखर रॉय यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत ममता बॅनर्जी यांना एक पत्र लिहले आहे. INDIATODAY ने याबाबत वृत्त दिले आहे.
भाजपचे कौतुक
निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सत्तेत आल्याबरोबत त्यांनी भाजपजे गुणगान सुरू केले. भाजपचे कौतुक करताना त्यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, ‘बंगालच्या इतिहासात पहिल्यांदाच मतदारांनी भारतीय जनता पक्षाला जागांच्या बाबतीत एवढा मोठा विजय मिळवून दिला आहे. नवनिर्वाचित सरकारने आपल्या निवडणूक आश्वासनांनुसार बंगालच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुनर्रचनेसाठी अनेक कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यास आधीच सुरुवात केली आहे’, असे सुखेंदू रॉय यांनी राजीनाम्यानंतर म्हटले आहे.
20 खासदारांची सुवेंदू अधिकारींसोबत बैठक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसच्या २९ लोकसभा खासदारांपैकी तब्बल २० खासदारांनी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांची भेट घेतली आहे. सुवेंदू अधिकारी सोमवारी दिल्लीत पोहोचले आहेत. तिथे ही भेट झाल्याचे समजते. पीटीआयने देखील या संदर्भातील वृत्त प्रिसद्ध केले आहे.



























































