यशोगाथा – सह्याद्रीच्या दुर्गम घाटवाटांवर विशाल वळवीची दमदार कामगिरी; १०० किमीची अल्ट्रा ट्रेल स्पर्धेत अव्वल, नवा विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जव्हार तालुक्यातील चिंचोंडा या गावात राहणारा विशाल वळवी याने सह्याद्रीच्या दुर्गम घाटवाटांवर दमदार कामगिरी केली आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या ‘द ग्रेट मावळा घाटी अल्ट्रा ट्रेल १०० किमी’ स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकावत अव्वल स्थान मिळवले आहे. १०० किलोमीटरचे आव्हानात्मक अंतर अवघ्या १४ तास २३ मिनिटांत त्याने पूर्ण केले असून या यशाबद्दल विशालवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरी खोऱ्यांच्या तोंडील तारेचा घाटामधील अंतर कमी वेळेत कापणे हे एक मोठे आव्हान असते. पण सर्व अडथळ्यांवर चपळाईने मात करत विशाल वळवी याने ही स्पर्धा जिंकली. पुणे जिल्ह्यातील भोर-वेल्हे परिसरातील सह्याद्रीच्या दुर्गम पर्वतरांगांमध्ये ५ जून रोजी पहाटे ४ वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. टीमकुडे फॉरेस्ट रिसॉर्ट परिसरातून सुरू झालेल्या स्पर्धेचा मार्ग कुरवंडे खिंड, मढाई माता बेस, पाबे घाट खिंड आदी दुर्गम ठिकाणांतून जात होता. कच्च्या पायवाटा, दाट जंगल, उंचसखल घाटमार्ग आणि कठीण चढ-उतार यांमुळे ही स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक ठरली.