FIFA World Cup 2026 – वर्ल्ड कप हुकला, मानधन मिळाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न भंगलेल्या सोमालियाचे रेफ्री ओमर आर्टन यांना फिफाने दिलासा दिला आहे. 52 अधिकृत रेफ्रींमध्ये निवड झालेल्या आर्टन यांना 6 जून रोजी मियामी विमानतळावर प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे त्यांना स्पर्धेत काम करता आले नाही. मात्र फिफाने त्यांच्या सेवांचा सन्मान राखत वर्ल्ड कपसाठी निश्चित करण्यात आलेले संपूर्ण मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.