Share Market Update – सेन्सेक्समध्ये 1,100 अकांची उसळी; निफ्टीनेही झेप घेतली, गुंतवणूकदारांना 10 लाख कोटींचा फायदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि अमेरिकेमध्ये शांतता करार आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबाबत एकमत झाल्यानंतर शेअर बाजाराला सुगीचे दिवस आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी कराराची घोषणा करताच जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली. याचे सकारात्मक पडसात हिंदुस्थानच्या शेअर बाजारावर झाला.

सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशई बाजार उघडतात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत मोठी तेजी दिसून आली. बाजार सुरू होताच सेन्सेक्सने 1,100 अंकांपेक्षा जास्त झेप घेतली, तर निफ्टीमध्ये 350 अंकांची वाढ झाली. यामुळे गुंतवणूकदारांना 10 लाख कोटींहून अधिक फायदा झाला.

सकाळी 10 च्या सुमारास सेन्सेक्स 1096.97 अंकांच्या अर्थात 1.45 टक्क्यांच्या वाढीसह 76,624.92 वर पोहोचला होता. तर निफ्टीही 329.90 अकांच्या अर्थात 1.4 टक्क्यांच्या वाढीसह 23,952.80 वर व्यवहार करत होता. आगामी काळामध्ये यात आणखी वाढ होण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

रुपया मजबूत

शेअर बाजारासोबतच रुपयामध्येही सुधारणा पाहायला मिळाली. डॉलरच्या तुलनेत रुपया 7 पैशांनी मजबूत होऊन 94.68 वर उघडला. शुक्रवारी रुपया 95.11 वर बंद झाला होता.

इराण-अमेरिका शांतता करार होताच कच्च्या तेलाच्या किमती 5 टक्क्यांनी घसरल्या; पेट्रोल-डिझेल, एलपीजी स्वस्त होणार?