
ब्राझीलमधील पश्चिम रिओ डी जानेरोमध्ये दोन हेलिकॉप्टर हवेत टक्कर झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. टक्कर झाल्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. एका पार्किंग लॉकमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने तिथे उभ्या असलेल्या गाड्यांनाही आग पसरली. शहराच्या पश्चिम भागातील रेक्रेओ दोस बांदेइरांतेस (Recreio dos Bandeirantes) परिसरात घडला.
दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर एअरबस एच125 आणि बेल 206बी जेट रेंजर होते. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हा अपघात रविवारी सकाळी 8.59 च्या सुमारास झाला. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठी आग लागली, या किमान 20 वाहने जळून खाक झाली, असे अग्निशमन दलाने सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातात ठार झालेले सर्वजण दोन्ही हेलिकॉप्टरमधील कर्मचारी होते. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि बचाव पथकांनी घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे आणि मदतकार्य सुरू केले.
























































