
काही दिवसांपूर्वी सगळ्यांच्या मोबाईलवर एकाच दिवशी एकाच वेळी इर्मजन्सी अलार्म वाजले होते. मात्र आता असा अलार्म वाजणार नाही. कारण सरकारने काही दिवस ही सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम सध्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. काही सुधारणा केल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू केली जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी एनडीएमएने नागरिकांना नैसर्गिक आपत्तींचा इशारा देण्यासाठी एक सेवा सुरू केली होती. याअंतर्गत लोकांच्या मोबाईलमध्ये एकाच वेळी सायरनप्रमाणे आवाज येतो आणि मेसेजही फ्लॅश होतो.



























































