आगीच्या अफवेने प्रवाशांनी उड्या मारल्या, ट्रेनच्या धडकेत चौघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
4-killed-as-passengers-jump-off-train-after-fire-rumour-hit-by-another-train-in-morena-mp

मध्य प्रदेशातील मोरेना येथे रविवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला. उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी रुळांवर उडी मारली. त्यावेळी त्यांना समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने धडक दिली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.

उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेन मोरेना जिह्यातून धावत होती. ट्रेन हेतमपूर स्टेशनजवळ पोहोचत असताना, ट्रेनला आग लागल्याची अफवा अचानक पसरली. हे ऐकताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. घाबरून, जीव वाचवण्यासाठी त्यांनी विचार न करता ट्रेनमधून रेल्वे रुळांवर उड्या मारायला सुरुवात केली. जे रुळांवर उतरले होते, त्यांना हे माहीत नव्हते की बाजूच्याच रुळावरून पातालकोट एक्सप्रेस ट्रेन वेगाने येत होती. पातालकोट ट्रेनने रुळांवर उभ्या असलेल्या या प्रवाशांना धडक दिली. अपघात इतका भीषण होता की अनेक जण जागीच ठार झाले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले.