कल्याण पूर्वेतील रस्ता रुंदीकरणामुळे रहिवासी होणार बेघर, केडीएमसी मुख्यालयावर धरणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण पूर्वेतील यू-टाईप रस्ता रुंदीकरणामुळे अनेक रहिवासी बाधित होणार आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. टळटळत्या उन्हात या बाधितांनी केडीएमसीच्या मुख्यालयावर धरणे आंदोलन छेडत आपला संताप व्यक्त केला. लवकरात लवकर आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन छोडण्यात येईल, असा इशारा पुनर्वसन कृती समितीने प्रशासनाला दिला आहे.

यू-टाईप रस्ता रुंदीकरण प्रकल्पामुळे अनेक कुटुंबे बेघर होणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनाची हमी मिळाल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. या आंदोलनात महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. होता. शिष्टमंडळाने आयुक्तांकडे मागण्यांचे निवेदन सादर करत बाधितांच्या पुनर्वसनासंदर्भात सविस्तर चर्चा केली. सध्या यू-टाईप रस्ता रुंदीकरण प्रकल्प आणि त्यातून निर्माण झालेला पुनर्वसनाचा प्रश्न हा महत्त्वाचा विषय ठरला आहे.