तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर खासदारांची यादी आली समोर? जाणून घ्या नावं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेतील 28 खासदारांपैकी 19 खासदारांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोर खासदारांच्या गटाने लोकसभेतील सत्ताधारी भाजप प्रणित NDA ला पाठिंबा देणार असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आहे. या पत्रावर सही करणाऱ्या त्या 19 खासदारांची नावे समोर आली असून यात ममता बॅनर्जी यांचे जवळचे मानले जाणारे युसुफ पठाण, सयोनी घोष आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा देखील समावेश असल्याचे समजते. अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार या खासदारांनी केली बंडखोरी –

1 . शत्रुघ्न सिन्हा (आसनसोल)
2 . काकोली घोष (बारासात)
3. जगदीश चंद्र बसुनिया (कूचबिहार)
4. खलील उर रहमान (जंगीपूर)
5 . युसूफ पठाण (बहरामपूर)
6 . अबू ताहीर खान (मुर्शदाबाद)
7. पार्थ भौमिक (बॅराकपूर)
8. बापी हलदार (मथुराबूर)
9. सायोनी घोष (जाधवपूर)
10. माला रॉय (कोलकाता दक्षिण)
11. मिताली बाग (आरामबाग)
12. दीपक अधिकारी / देव (घाटाळ)
13. कालिपदा सोरेन (झालग्राम)
14. जुन मालिया (मेदिनीपूर)
15. अरूप चक्रवर्ती (बांकुडा)
16. शर्मिला सरकार (बर्धमान पूर्व)
17. असित कुमार माल (बोलपूर)
18. शताब्दी रॉय (बीरभूम)
19. रचना बॅनर्जी (हुगळी)