
सोशल मीडियावर एका चिमुकलीने सादर केलेल्या लावणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या चिमुकलीने “गोऱ्या गोऱ्या टाचत काटा रुतला’’ या लावणीवर भन्नाट डान्स केला. एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान स्टेजवर केलेला तिचा डान्स पाहून प्रेक्षक अवाक झाले. प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिटय़ा वाजवून तिचे कौतुक केले. हा व्हिडीओ @durva_z_15 या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला असून नेटकऱयांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. चिमुकलीने गाण्यावर केलेल्या स्टेप्स आणि तिचे हावभाव पाहून नेटकऱयांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

























































