
कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केले. अपघातात काही जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार, बिकानेर जिल्ह्यातील श्रीडुंगरगड परिसरातील हेमसर फाटकाजवळ सोमवारी हा अपघात झाला. कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. मृतांची अद्याप ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. जखमींना उपचारासाठी उप-जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



























































