
नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आरे कॉलनीतील 42 अंगणवाडय़ांमधील बालकांसाठी 880 पाट्यांचे वितरण करण्यात आले. आरे कॉलनीच्या युनिट क्रमांक 6 येथील स्वामी समर्थ मठात हा कार्यक्रम पार पडला. नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व समाजसेवक सुनील कुमरे आणि समाजसेविका सुनिधी कुमरे यांनी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते अमोल कीर्तिकर, मुख्य अंगणसेविका प्रियंका सावते, स्वाती महाडिक, अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा अंजली सपकाळे व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी युनियनच्या सरचिटणीस वसिमा काझी यांच्यासह ट्रस्टचे खजिनदार विजय खरात, उपखजिनदार सुरेश ढाणे तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.





























































