
मुंबई मेट्रो वनच्या रेल्वे ट्रॅकवर तरुण चालत गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी अभिनंदन सुळे या तरुणाविरोधात गुन्हा नोंद केला. अभिनंदन हा मेट्रोच्या ट्रॅकवर चालत गेल्यामुळे दहिसर ते वर्सोवा ही मेट्रो सेवा 17 मिनिटे बंद ठेवावी लागली होती.
तक्रारदार हे मेट्रो वन अंधेरी स्थानकात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. बुधवारी दुपारी तक्रारदार हे डय़ुटीला होते. तेव्हा
वॉकी टॉकीवर स्टेशन कंट्रोलर याने कॉल दिला. दोन नंबर प्लॅटफॉर्मवर ट्रॅक एक्सेस झाला असून एक जण ट्रॅकवर उतरल्याचे सांगण्यात आले. तसेच मेट्रो ट्रेन थांबवण्यात आली. त्या माहितीनंतर तक्रारदार हे प्लॅटफॉर्म 2 च्या दिशेने गेले. तेथे एक जण आझाद नगर मेट्रो स्थानक येथे ट्रॅकवरून चालत येत असल्याचे तक्रारदार याना दिसले. त्याला थांबवण्यासाठी तक्रारदार तेथे गेले होते.



























































