
67 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी खासगी विमा कंपनीच्या रिलेशनशिप मॅनेजरला वनराई पोलिसांनी अटक केली. ऋषी दास असे त्याचे नाव आहे. त्याने 450 पॉलिसी धारकाच्या पैशाचा अपहार केल्याचा आरोप आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
गोरेगाव येथे खासगी विमा कंपनी आहे. त्या पंपनीत ऋषी हा कामाला होता. पॉलिसी समजावणे, माहिती अद्ययावत करणे, पॉलिसी धारकाची कागदपत्रे तपासणे अशी त्याच्यावर जबाबदारी होती. गेल्या वर्षी पंपनीच्या ऑडिटसह कंपनीत आर्थिक घोटाळा झाल्याचे उघड झाले. त्यामुळे या प्रकरणाची शहनिशा करण्यात आली.



























































