
जर्मनीतील म्युनिक शहरात भीषण रेल्वे अपघात झाला. शनिवारी दोन मालगाड्यांची पुलावर समोरासमोर धडक झाली. धडक झाल्यानंतर मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अग्नीशमन दल, बचाव पथके आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले.
एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, म्युनिकच्या उत्तरेकडील जिल्हा असलेल्या मिल्बर्टशोफेन येथे ही घटना घडली. अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे. या घटनेची माहिती आपत्कालीन सेवांना देण्यात आली. अग्निशमन दल आणि बचाव पथकांसह सुमारे 60 आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले होते, असे अग्निशमन दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.

























































