
राजस्थान सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही बालविवाहाच्या प्रथेला आळा घालण्यासाठी लग्नपत्रिकेत वधू-वराची जन्मतारीख नमूद करण्याचे सूतोवाच महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत केले. त्याबाबतचा अभ्यास ग्रामविकास, विधी आणि न्याय तसेच संबंधित विभागांच्या समन्वयातून केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. बालविवाह पूर्णपणे रोखण्यासाठी सरकारने कृती आराखडा तयार केला असून, पुढील 5 वर्षांत बालविवाहाचे प्रमाण 10 टक्क्यांच्या आत आणण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.


























































