ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन देवेंद्र! म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून अमित शहांनी त्यांना मिंध्याकडे पाठवलेत- उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन देवेंद्र आहे. कारण आज ना उद्या, त्यांना असं वाटतय की, देवेंद्र फडणवीस कदाचित उद्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरतील. म्हणून आत्ताच त्यांचे पंख काप, महाराष्ट्रातून एकही माणूस दिल्लीपर्यंत पोहोचता कामा नये. म्हणून त्याला तिथल्या तिथे गुंतवून ठेव, म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून अमित शहांनी त्यांना या मिंद्याकडे पाठवलेत, हा माझा स्पष्ट आरोप नाही तर, माझा समज आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेनेशी गद्दारी करून शिंदे गटात जाणाऱ्या खासदारांविरोधात महाराष्ट्रात प्रचंड चीड आणि संताप असून, ज्या मतदारांनी या खासदारांना निवडून दिले त्या मतदारांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झंझावाती दौऱ्यावर निघाले आहेत. यातच हिंगोलीत कार्यकार्ता मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे असे म्हणाले आहेत.

आपल्या भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज सकाळपासून शिवसैनिकांना भेटतोय. अनेक जणांना असं वाटतंय दोन पाच खासदार फोडले, पंचवीस, तीस आमदार फोडले म्हणजे शिवसेना संपली. त्यांना मुळामध्ये कळलंच नाही की, शिवसेना म्हणजे कडवट कट्टर शिवसैनिक. निवडून आलेले लोकप्रतिनिधी हा वेगळा भाग आहे. आम्ही ज्यांना निवडून दिलं, या लोकांनी त्यांना मोठं केलं, असे अनेक लोकं ज्यांना शिवसैनिकांनी मोठं केलं, ते गेले. पण तरी शिवसेना काही संपत नाहीत आहे आणि कोणी संपू शकत नाही. नाही तर तुम्हीच बघा (सभेत उपस्थित नागरिक आणि शिवसैनिक), या हिंगोली मतदारसंघात लागोपाठ दोनदा गद्दारी झाली, आधीचाही गद्दार गेला. तो तर आता तोंडच दाखवू शकता नाही, चोर वाटेने आतमध्ये घ्यावं लागलं त्याला. कारण निवडणूक लढण्यासाठी लोकांसमोर जाणार कसं, कारण तोंडाला हळद नाही, तर काळं लागलं आहे. तोंडाला काळी फासलेली माणसं लोकांसमोर जाऊच शकत नाही. म्हणून हिंगोलीमधला खासदार पळून गेला, तो पडला. यवतमाळ, वाशिममधील आधी जे होते ते गेले. त्यांनी तर उभं राहण्याचं धाडसच केलं नाही. ज्यांनी ज्यांनी, विशेषतः परभणी आणि हिंगोली, इतिहासच असा आहे की, पहिल्यापासून कोणीही इकडचा तिकडे गेला, तरी इथला मतदार आणि शिवसैनिक हा कायम शिवसेनेसोबतच राहिलेला आहे.”

उद्धव ठाकरे म्हणाले, “संजय राऊत तुम्ही आता म्हणत आहात, पण यांच्याकडे जास्त माहिती असेल. चार वर्षांपूर्वी आमदारांचा रेट ५० खोके होता. यांचा किती असेल, आता माहित नाही मला. जे स्वतः खोख्यासाठी खोख्यात गेलेले आहेत, त्यांना आपल्याला धोका दिला आहे. तरी अनेकजण मला तेव्हा सांगत होते की, उद्धवजी याला तिकीट देऊ नका, हा फुटलेला आहे. हा फुटणार. म्हटलं नाही, असं कसं आपला आमदार होता, कट्टर राहिलेला आहे. एवढी फाटाफूट झाली, तरी सोबत आहे. नाही फुटणार. म्हटलं नाही साहेब तुम्ही लिहून ठेवा, हा फुटणार. आता नुसता फुटलाच नाही तर, माझ्या कानावर आलंय की, याने गद्दारांचं नेतृत्व केलं. असा हा गद्दारांचा गद्दार. बरं, विश्वास ठेवायचा नाही कसा? मी यवतमाळ, वाशिममध्ये गेले होतो, तिथल्या खासदारांनी काय सांगितलं होतं, जेव्हा मी दोन आठवड्यांआधी घरी खासदारांची बैठक बोलावली होती. त्यावेळी तीन खासदार होते. अनिल देसाई, अरविंद सावंत आणि संजय राऊत. बाकीचे सगळे ऑनलाईन होते. हल्ली ती सोय झाली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सची. यामध्ये यवतमाळचे खासदार होते. त्यांनी मला आदल्यादिवशी फोन केला. मला म्हणाले उद्धवजी काय करू, मी म्हटलं काय करायचं, यायचं आहे ना, म्हणाले, माझ्या मुलीला बघायला पाहुणे येणार आहेत, सोयरीक जुळवायची आहे. मग काय करू? आता असं कारण सांगितल्यावर तुम्ही काय सांगायला? या म्हणून सांगाल. सोयरीक सोडून या.. आता मला काय माहित मुलींच्या ऐवजी यांची सोयरीक जुळवत होते. यांचा भाव ठरत होता, किती खोके. काय आव आणत होते, आम्ही सगळे साहेब तुमच्यासोबत आहोत. इथला तर, एवढा हरामखोर. पोराला तिकीट घेतलं आणि मला सांगितलं साहेब याला अपक्ष उभा करतो. म्हटलं, अपक्ष मग महाविकास आघाडी कशी मते देणार. म्हटला नाही, साहेब. आपलाच पोरगं हैना. कुठे जाणार. चला, ठेवला विश्वास. एवढं करून थांबला नाही. उद्या मतदान आहे, आदल्यादिवशी मला फोन करून सांगतो की, उद्धवजी या एक दोघांना तुम्ही फोन एकला तर आपल्याला मतं मिळतील. बरं, ते पण केलं. मग ज्योतिबाला विचारतोय, आपल्या इथल्या जिल्हाप्रमुखाला विचारतोय, तर ते म्हणतायत साहेब हा कालपासून गायबच आहे. म्हणजे हा किती नायलायक किती खोटारडा आहे की, कोणाला अविश्वास वाटू नये, म्हणून स्वतःच फोन करून सांगायचा की, साहेब मी आता इकडे आहे. मी इकडे चाललोय. पण जरा बघा उद्याचं यांना मतदान मिळालं तर.एवढा नालायकपणा ज्याच्या रक्तामध्ये भिनलेला आहे, एवढी गद्दारी ज्याच्या रक्तात भिनली आहे. मला तर लाज वाटते की, अशी गद्दार माणसं ही माझी चूक आहे. म्हणून मी तुमची माफी मागतो की, मी हे बुजगावण उभं केलं होतं. हे बुजगावणं होतं. म्हणजे अक्षरशः लिलावात जशी उभी राहतात तशी ही, त्यांना काय शब्द वापरायचा तो वापरा. कारण हल्ली शिवीगाळी, एका मुंबईच्या खासदारा पत्रकाराने शिवीगाळी केली. कहर झाला. ही सगळी लोक बुरका घालून आपल्यात वावरत होती. वाघाच कातड पांगरलेले लांडगे होते. कोल्ले होते. गाढव होती. त्यांना आपण काय प्रेमाने डोक्यावरती घेतलं होतं. पण त्या लायकीची माणसं नाहीयेत. नव्हतीच. आणि जो परभणीचा इतिहास आहे, जो हिंगोलीचा इतिहास आहे तोच मला परत इकडे पाहिजे. जो जो गेला तो संपला. तो या राजकारणातून बाद झाला. म्हणजे पूर्ण बादच झाला त्याला बादच करून टाकायचा. आजपासून तुम्ही सगळे खासदार आहात आणि या हिंगोलीची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय.”

ते म्हणाले की, “विकास निधी म्हणजे कसला, ती एक लगेच हल्ली काय झाले, या मोबाईलवरन एवढं काही जग जवळ पण आलंय आणि सगळ्यांच्या अडचणी पण वाढल्यात. नको त्या वेळेला नको, ते फोटो नको, ते रील सगळीकडे जातात. तसं यांचे एक रील फिरतंय. विमानात बसलेलेत. कुठून आणला पैसा? चार्टर्ड विमान. तुम्ही दादांनो कधीतरी विमानतळ तरी पाहिले का? माझा शेतकरी, मराठवाड्यातला शेतकरी. लातूरचाच, ज्याच्याकडे बैल नाही. पत्नीला नांगराला जोडून तो शेती करतोय आणि हे विकास करायला नायक लोक तिकडे जाता आहेत. का, ते शेतकऱ्याचा पहिला विकास कर. नांगराला बैल नाहीये. सगळं गहान टाकलेलं आहे. शेतजमीन गहाण टाकलेली आहे. खत खरेदी करायला पैसे नाही, बियाण करायला पैसे नाहीयेत. मोदी बाबांचे ठीक आहे. मोदी बाबा सांगतात खतं वापरू नका. सोनं खरेदी करू नका. अरे सोनं खरेदी करायची ताकदच तुम्ही ठेवलेली नाही, माझ्या या देशातल्या नागरिकांची. कसं करणार सोनं खरेदी? पण सोनं खरेदी करू नका आमदार, खासदार खरेदी करा. आमदार खासदारांचा भाव सोन्यापेक्षा स्वस्थ झाला की काय, गळ्यात घालून फिरताय आमदार खासदारांना. नालायकपणाचा किती कहर करायचा. एक तर स्वतःच्या हिमतीवरती खासदार निवडून आणता आलेले नव्हते. हे म्हणे आता बोमलत फिरतायत उद्धव ठाकरे, फिरत नाहीत, फिरत नाही. मी आलो नव्हतो तुमच्या गावात, तिकडे जिथून जिथून लोक आलेत, तुमच्या प्रत्येकाच्या विधानसभा मतदारसंघात मी आलो होतो की, नव्हतो (उपस्थित नागरिकांना त्यांनी प्रश्न विचारला). मग मी जर का असं बोललो, गर्वाने. मी आलो नसतो, मी फिरलो नसतो, तर या भुजगवण्याला खासदार केलं असतं तुम्ही. एक तर पक्ष चोरलेला. चिन्हो चोरलेलं. नवीन चिन्ह घेऊन आपण लोकांसमोर गेलो. तुम्ही सगळ्यांनी अक्षरशः दिवस रात्र एक करून, ना कुटुंबाकडे पाहिलं ना तुमच्या प्रकृतीकडे पाहिलं, रक्ताचं पाणी केलं. रक्त आठवलं. समोरून पैशाचा धबधबा कोसळत होता. काय तुम्हाला पैशाच्या ऑफर आल्या नव्हत्या, कशाला काम करतो, गप्प बस. तुला एवढे पैसे देतो. अनेक शिवसैनिकांना आल्या. पण शिवसैनिकांनी त्या हरामाच्या पैशाला लात मारली आणि हातात भगवा धरलेला शिवसैनिक हा निष्ठेने त्याच्यासमोर उभा राहिला. निष्ठा कधी विकली जाऊ शकत नाही. निष्ठेची कोणी किंमत करू शकत नाही.”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “जी एक लाट निर्माण केली गेली होती, राम मंदिर बांधले, राम मंदिर बांधले. म्हणून देशात मोदींची लाट होती. त्या मोदींच्या लाटेत शेवटचे फक्त 15 दिवस आपल्याला मशाल निशाणी मिळाल्यानंतर महाराष्ट्राने भाजपच गाढव हे अडवलं होतं आपण. महाविकास आघाडीचे 31 खासदार आपण निवडून आणले होते. त्याच्यामध्ये मी अभिमानाने सांगेन, माझ्या मराठवाड्याने तीन खासदार शिवसेनेचे दिले होते निवडून. हे भाजपच्या विरोधातल मतदान नव्हतं, हे मशालीच्या विश्वासावरच मतदान नव्हतं, शिवसेना प्रमुखांच्या चेहऱ्यावरती बघून मतदान झालेलं नव्हतं, मग मोदींच्या विरोधात एवढी लोक असताना, पुन्हा तुम्ही त्यांच्याच कडेच का गेलात? बरं आणखीन एक रहस्य अस आहे की, जिथे काही भविष्य नाहीये, भवितव्य नाहीये. म्हणजे मिंधेचं भवितव्य शून्य आहे. काम संपलं की, मिंधेंला सुद्धा कचऱ्याच्या टोपलीत टाकणार आहेत, हे लिहून ठेवा तुम्ही. पण भाजपात हे जायच्या ऐवजी मिंधेंकडे का गेले? हे मोठं कोड आहे. भाजपात का नाही गेले? मला तर आता शंका वाटते की, काल विमानामध्ये योगायोग असेल. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते माझ्यासोबत. मग लगेच पत्रकारांच सुरू झालं, चर्चा काय झाली? चर्चा म्हटलं उच्चस्तरीय चर्चा होती. ढगांच्या वरची. पण मला अशी शंका वाटते की, हे जे म्हणतात ना ऑपरेशन टायगर, अरे टायगर वरती कोण ऑपरेशन करू शकत नाही. एक पंजा मारला ना तुमच सगळे आतडी बाहेर येतील. हे ऑपरेशन टायगर नाहीये. मला शंका येते, हे ऑपरेशन देवेंद्र आहे. कारण आज ना उद्या, कारण देवेंद्र त्यांना असं वाटतय की, देवेंद्र फडणवीस कदाचित उद्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरतील. म्हणून आत्ताच त्यांचे पंख काप, महाराष्ट्रातून एकही माणूस दिल्लीपर्यंत पोहोचता कामा नये. म्हणून त्याला तिथल्या तिथे गुंतवून ठेव, म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून अमित शहांनी त्यांना या मिंद्याकडे पाठवलेत, हा माझा स्पष्ट आरोप नाही तर, माझा समज आहे. असू शकतो की, नसतो. नाही तर काय होतं, आता निवडणूक थोडीच आहे. निवडणूक नाहीये. मग कशासाठी तुम्ही माझे खासदार फोडले? बरं फोडले ते फोडले, तुम्ही स्वतःकडे न घेता तुम्हाला जो पाठिंबा देऊ शकतो, तुमचा जो कोणी एक लाचार इकडे तुम्ही ठेवलेला आहे. बटीक, गुलाम. त्याच्याकडे सरकवलेले आहेत. म्हणजे उद्या जर का वेळ आली की, तुम्ही पंतप्रधानदी कोणाला मत द्याल, तर हे सगळे गुलाम हे अमित शहांना मतदान करतील. ही पुढची व्यवस्था आहे, म्हणून शिवसेना फोडतायत.”