
गद्दारांनी ही गद्दारी शिवसेनेशी नाही, तर हिंदूंशी, हिंदुत्वाशी केली आहे. याचा जाब फक्त गद्दारांना विचारून चालणार नाही, तर भाजपालाही विचारावा लागेल, अशी जबरदस्त तोफ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ येथे डागली. शिवसेनेशी गद्दारी करून शिंदे गटात जाणाऱ्या खासदारांविरोधात महाराष्ट्रात प्रचंड चीड आणि संताप असून, ज्या मतदारांनी या खासदारांना निवडून दिले त्या मतदारांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झंझावाती दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्याची सुरुवात शनिवारी यवतमाळ येथून झाली. यावेळी कार्यकार्ता मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी गद्दारांसह भाजपाचाही खरपूस समाचार घेतला.
शिवसेना फक्त एकच आहे. गद्दार सेना म्हणजे शिवसेना नाही. कुणीही उपरा आला आणि त्याला नाव दिले हे आम्ही मानायला तयार नाहीत. शिवसेना, भगवा फक्त एकच असून या भगव्याचा, शिवसेनेचा खासदार निवडून आणण्यासाठी आजपासून तयारीला लागला. जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहेत, तोपर्यंत मी कुणालाही घाबरत नाही. जोपर्यंत तुम्ही सोबत आहात तोपर्यंत कुणी कितीही प्रयत्न केले तरी ठाकरेच काय शिवसेना संपवू शकणार नाहीत. तो विश्वास माझ्यात असून त्या विश्वासाच्या जोरावर या अन्यायाला तोडून फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, असे वचनही उद्धव ठाकरे यांनी दिले.
आज यवतमाळ येथे निष्ठावंत शिवसैनिकांच्या वज्रमुठेची ताकद दिसली.
पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी उपस्थित निष्ठावंत शिवसैनिकांसोबत संवाद साधत, विकासनिधी मिळत नाही म्हणून बोंबा मारणाऱ्या आणि फितुरी करणाऱ्या गद्दार खासदारांचा समाचार घेतला. प्रत्येक मतदाराने आपल्या… pic.twitter.com/jbRNsEeZkq
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 27, 2026



























































