
कांदिवली येथील आश्रमात मुलाचा सांभाळ करणाऱ्या एकाने दोन अल्पवयीन मुलांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा नोंद केला. पीडित मुलगा हा एका आश्रमात राहतो. त्याचे चौथीपर्यंत शिक्षण झाले आहे. वडिलांच्या निधनानंतर तो मुलगा आणि त्याचा भाऊ त्या आश्रमात राहत आहेत. ८ जूनला सकाळी मुलाला आणि त्याच्या भावाला सकाळी पाणी भरण्याचे काम दिले गेले. पाणी भरल्यानंतर त्यांना किचनमधील काम करायचे होते. मात्र त्या दोघांना जाग आली नाही. मुलांना सांभाळणारे एकाने मुलाच्या भावाला बाटली फेकून मारली. तसेच तक्रारदार मुलालादेखील मारहाण करून गळा आवळला असा आरोप आहे. मुलाने याची माहिती त्याच्या एका मित्राला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
… म्हणून त्याला समाजाला धडा शिकवायचा होता
मोहरमनिमित्त भायखळा येथे आयोजित केलेल्या मिरवणुकीत फैयाज प्रेमजी याने ‘पेनकिलर’च्या नावाने उंदीर मारायच्या गोळ्या वाटत होता. मोहरमच्या मिरवणुकीला टार्गेट करण्यासाठी हे कृत्य केल्याचे त्याने चौकशीत सांगितले. जास्तीत जास्त लोकांना हानी पोहचवण्याचा त्याचा प्रयत्न होता, अशी कबुलीच त्याने दिली. दरम्यान, त्याची पत्नी त्याला सोडून गेली. भावाची पत्नी देखील सोडून गेली. पण या प्रकरणांमध्ये समाजाकडून आवश्यक मदत मिळाली नाही. त्यात नोकरीचा प्रश्न देखील होता. यामुळे तो नैराश्यात अडकला होता.




























































