
देशात पेट्रोल आणि डिझेलची दरकपात किमान 2-3 महिने होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. इंधन दरकपातीबाबत सध्याच काही सांगता येणार नाही, असे पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांना महागाईपासून इतक्यात दिलासा मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
इराण युद्ध सुरु झाल्यानंतर तेल कंपन्यांनी मे हिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 7.50 रुपये प्रतिलीटर एवढी वाढ केली होती. मात्र, युद्ध थांबल्यानंतर कच्च्या तेलाचे दर आता युद्धपूर्व स्थितीत 70 डॉलर प्रति बॅरेलच्या आसपास आले आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कधी कमी करणार, असा सवाल विरोधी पक्षांनी सरकारला केला आहे. यासंदर्भात हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले, की इराण युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले होते. त्यावेळी अतिशय महाग दरात कच्चे तेल विकत घेतले. सध्याच्या दराने खरेदी केलेले कच्चे तेल दाखल होण्यास वेळ लागेल. त्यानंतर कच्च्या तेलाचे दर स्थिर राहिल्यास दरकपातीचा विचार केला जाऊ शकतो, असे पुरी म्हणाले.
तेल कंपन्यांना 74 हजार कोटी रुपयांचा तोटा
हरदीपसिंग पुरी म्हणाले, की युद्ध काळात मे महिन्यापर्यंत इंधनचे दर वाढवले नव्हते. त्यानंतरही केलेली दरवाढ कमीच होती. तेल कंपन्यांना या कालावधीत एकूण 74 हजार 781 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.





























































