
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ च्या बोगद्याजवळ दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यावरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
”’मिसिंग लिंक’चे (Missing Link) उद्घाटन 1 मे 2026 रोजी करण्यात आले होते. या लिंकचा खर्च हजारो कोटींनी वाढला आहे. आता याचे चेक्स (तपासणी) आणि उद्घाटन होऊन 2 महिनेही झाले नाहीत, तोच येथे दरड कोसळणे आणि बरेच काही घडले आहे. इतकेच नाही तर, पुण्याला जाताना आणि परत येताना याचा वापर करताना माझ्या असे लक्षात आले आणि मी ते जाहीरपणे सांगितले देखील की, या रस्त्याचा ५० फूट भागही सपाट नाही. तो संपूर्ण चढ-उतारांचा रस्ता आहे आणि जणू काही आपण एखाद्या बोटीत बसून लाटांवरून प्रवास करत आहोत असा भास होतो. रस्ते असोत वा मंदिरे, भ्रष्टाचार हे भाजप आणि मिंधे यांचे पहिले नाव आहे”, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी सरकारला फटकारले





























































