श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिण द्वार सोहळा मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता संपन्न झाला त्यामुळे पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. सोमवारी मंदिराच्या चारही बाजूला पुराच्या पाण्याने वेढा घातला आणि मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता चालू सालातील पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला.

भाविकांनी दिगंबरा दिगंबराच्या व श्री गुरुदेव दत्त च्या गजरात दक्षिण द्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला दक्षिणद्वार सोहळ्याची माहिती इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे प्रसारित झाल्याने पहाटे पासूनच सांगली कोल्हापूर इचलकरंजी मिरज आधी ठिकाणाहून भाविकांनी स्नान व दर्शनासाठी हजेरी लावली भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान मार्फत जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे दरम्यान श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी परम पूज्य श्री नारायण स्वामी यांचे मंदिरात ठेवण्यात आली आहे. दरम्यान नृसिंहवाडी व औरवाड यांना जोडणारा जुना पूल पुराच्या पाण्याखाली गेला असून तालुक्यातील शिरोळ राजापूर आणि तेरवाड बंधारे यापूर्वीच पाण्याखाली गेले आहेत.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तर बाजूने येणारा कृष्णा नदीचा प्रवाह येथील दत्त चरणांना स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडतो या सोहळ्याला दक्षिणदवार सोहळा म्हणतात . श्री चरणावरून येण्याऱ्या कृष्णा प्रवाहात स्नान केलेने पुण्याची प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा असलेने भाविक स्नान व दर्शनासाठी गर्दी करतात मात्र नदीची पाणी पातळी वाढणे, कमी होणे हे निसर्गावर अवलंबून असलेने व मंदिराच्या गर्भद्वाराची चौकट एक फूट उंचीची असलेने हा सोहळा कधी सुरू होईल व संपेल हे नक्की सांगता येत नाही यात स्नान करायला मिळणे हा योगायोगच असतो.हा सोहळा पाणी वाढताना व उतरताना असा दोन वेळा होतो दरम्यान श्री क्षेत्र नृसिंहवाडीत पहाटे काकड आरती पासून शेजारती पर्यंत सर्व देवस्थानचे नित्य कार्यक्रम परम पूज्य नारायण स्वामी महाराज यांच्या मंदिरातच पार पडणार आहेत. रोज रात्री साडेसात नंतर धूपाआरती तसेच येथील ब्रह्मवृंदांकडून कृष्णा नदीची पूजा व इंदुकोटी स्तोत्रांचे पठण केले जाणार आहे.तसेच अन्नछत्रातील भाविकांसाठी मिळणारा महाप्रसाद नदीचे पाणी वर येईपर्यंत सुरू राहणार असल्याचे देवस्थान समितीकडून सांगण्यात आले.