
फाटल्यागत कोसळत असलेल्या पावसामुळे कर्जत तालुक्याच्या जामरुंग गावातील आंबिवली पाझर तलाव आज फुटला. मातीचा बंधारा पाण्याच्या माऱ्याने वाहून गेल्याने मोठा हाहाकार उडाला असून प्रचंड वेगाने परिसरातील शेर्तामध्ये पाणी घुसले, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली बुहाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे अतिदुर्गम भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जामरूंग हे गाव कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भागात असून त्याच ठिकाणी आंबिवली पाझर तलाव आहे. ढगफुटीसदृश पडणाऱ्या पावसामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले असतानाच आंबिवली पाझर तलावाचा मातीचा बांध अचानक फुटला. आधीच येथील नद्या, नाले दुथडी भरून वाहत असून त्यात पाझर तलाव फुटण्याचे संकट निर्माण झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पाझर तलावाकडे धाव घेतली. तलाब फुटल्याचे दृश्य पाहण्यासाठी दूरदूरच्या गावांतील नागरिकही आले होते.
नुकसानभरपाई द्या!
शेतांमध्ये पाणी शिरल्याने खरिपाची पिके घेण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. दरम्यान प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे. आणखी काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने रहिवाशांनी नदी, नाले यांपासून दूर राहण्याचे



























































